मुंबईच्या १८ ते ४५ वयोगटातील स्त्रियांनी आपले केस एकाच वेळेस सोडण्याचा अनोखा विक्रम घडवून आणला. ‘फ्री युवर हेअर’ उपक्रमाचा भाग असलेल्या या विक्रमात स्त्रियांना सक्षम करत काळजी घेण्याच्या बाबतीत तडजोड न करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या विक्रमाची नोंद घेत गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स ने याच सोहळ्यात आपले प्रमाणपत्र बहाल केले.


एका हॉटेलातील प्रशस्त सभागृहात हा सोहळा रंगला. लॉरियल पॅरीस हायलरॉन प्युअर शाम्पू आणि कंडिशनरच्या अनावरण प्रसंगी हा विक्रम रचण्यात आला. एका प्रख्यात नृत्यकला सादर करणाऱ्या कंपनीच्या तरुण नर्तिकांनी बेधुंद नाचत, रंगमंचावर केस मोकळे सोडण्याचे नृत्य सादर करुन त्याच पद्धतीने या ५०० स्त्रियांना केस मोकळे सोडण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर तज्ज्ञ स्त्रियांनी त्यांना एकेक टप्पा पार पाडत, एकाच वेळी केस मोकळे सोडायला लावले. यामध्ये किशोरवयीन शालेय मुलींचा जास्त करून भरणा होता. त्यांच्यात उत्साह दिसून आला.