भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.
कालचा सामना विराट कोहलीसाठीही खूप खास होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोहलीने धमाकेदार खेळी खेळली आणि शतक झळकावले. यासह विराटने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा ऐतिहासिक विक्रम मोडला. कोहलीचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील ५० वे शतक होते. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
यावर विराटचे चाहते आनंदाने उड्या मारत होते. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलाही त्याच्या या कामगिरीचा अभिमान वाटला. अनुष्काने कोहलीला स्टेडियममध्ये सर्वांसमोर फ्लाइंग किस देऊन प्रेमाचा वर्षाव केला. त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता अनुष्काने किंग कोहलीसाठी एक खास नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, "देव हा सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट लेखक आहे. तुझ्या प्रेमाचा मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तू दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होताना, खेळताना पाहणं हे फार उत्कृष्ट आहे. तू नेहमी स्वतःशी, स्वतःच्या खेळाशी खरे असतोस. तू खरोखरच देवाचे मूल आहेस."
अनुष्का शर्माने इन्स्टा स्टोरीवर तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये अनुष्काने संपूर्ण टीम इंडियाला चिअर करताना लिहिले, 'ही, गन टीम'. आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, अनुष्काने मोहम्मद शमीचे सात विकेट घेतल्याबद्दल आणि सामनावीर ठरल्याबद्दल कौतुक केले आहे."
अनुष्का नेहमीच विराटची सर्वात मोठी चीअरलीडर असते. ती केवळ विराटलाच नाही तर संपूर्ण टीम इंडियाला सपोर्ट करते. विराट कोहलीच्या प्रत्येक शॉटवर अनुष्काची प्रतिक्रिया नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असते.