जागतिक महिला दिनी शेफ नताशा गांधी यांनी निवडक महिलांसमोर पनीर मखनी बिर्याणी व बटर चिकन बिर्याणी बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. 100 महिलांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. सोनी टीव्ही वर चालू असलेल्या ' मास्टर शेफ सहा' या कार्यक्रमाच्या त्या अंतिम स्पर्धक असून ' हाऊस ऑफ मिलेट्स ' च्या संस्थापक आहेत. या प्रसंगी केक देखील कापण्यात आला.

'शी हॅज गॉट दम ' असे या कार्यक्रमाचे बोधवाक्य होते. तोंडाला पाणी सुटेल अशी पनीर मखनी बिर्याणी व बटर चिकन बिर्याणी करण्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ मूरविण्याचं आणि मंद आचेवर अन्न शिजविण्याचं तंत्र शेफ नताशा यांनी समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या साध्यासोप्या टिप्समुळे प्रेस्टिज उपकरणांचा वापर करून घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ करणं किती सहजसोपं आहे, हे महिलांनी अनुभवलं. या प्रसंगी नताशा यांनी 'सोच' स्टुडिओची छानशी साडी परिधान केली होती.

विशेष म्हणजे शेफनी बिर्याणी करता करता सोप्या टिप्स पण दिल्या.
- तांदूळ 5-6 वेळा धुवावे. त्यावरील स्टार्च पूर्णपणे निघाला पाहिजे.
-- ते फक्त 30 मिनिटेच शिजवा. बासमती तांदूळ घ्यावा का, ही शंका विचारताच आवश्यकता नाही, असे त्या म्हणाल्या. अगदीच कुणी खास पाहुणे येणार असतील व त्यांना खुश करायचे असेल तर घ्या. अन्यथा रोजच्या खाण्यातील तांदूळ घ्यावा.
-- कोथिंबीरीच्या काड्या कापून त्या वाटणात घालाव्या. आपण पाने घेऊन त्या टाकून देतो. पण त्यात जास्त गन्ध असतो.
बिर्याणीला 'दम ' फक्त 10 मिनिटेच लावावा.
-- मिक्सर, ग्राइंडरमध्ये गरमागरम पदार्थ मिक्स करू नये. त्याचा ब्लास्ट होतो व ते बाहेर फेकले जातात. मास्टर शेफ कार्यक्रमात काही शेफनी हा प्रकार अनुभवला आहे.
--बिर्याणी चमचमित, तिखट करू नये. तिला मध्यम चवीची ठेवावी.