भारतात, २०२४ नुसार १० कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह आहे, तसेच इतर ३ कोटी व्यक्तींना मधुमेह होण्याचा उच्च धोका आहे. याचा अर्थ असा की ११.४ टक्के व्यक्तींना मधुमेह आहे, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे. २०२१ मध्ये, जवळपास ७००,००० भारतीयांचा मुधमेह, हायपरग्लायसेमिया, किडनी आजार किंवा इतर मधुमेह-संबंधित गुंतागूंतींमुळे मृत्यू झाला. या भयावह स्थितीमध्ये आजच्या जागतिक मधुमेह दिनी मधुमेहावर मात कशी करावी, याबाबत सविस्तर विवेचन डॉ. बत्राज हेल्थकेअरचे संस्थापक आणि मानद अध्यक्ष, पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी केले आहे. ते म्हणतात -
लक्षणे ओळखणे
मधुमेहाची लक्षणे लवकर ओळखणे या आजाराच्या गुंतागूंतींचे प्रभावी व्यवस्थापन आणि प्रतिबंधासाठी महत्त्वाचे आहे. यासंदर्भात लक्ष ठेवावीत अशी सामान्य लक्षणे म्हणजे अधिक तहान लागणे, जेथे व्यक्तीला सतत पाणी पित राहावेसे वाटते, जे रक्तातील शर्करेच्या उच्च पातळ्यांमुळे असू शकते. आणखी एक लक्षण म्हणजे वारंवार लघवीला होणे, विशेषत: रात्रीच्या वेळी अधिक लघवीला होते, जे अतिरिक्त ग्लुकोज उत्सर्जित करण्यासाठी मूत्रपिंड अधिक वेळ कार्यरत राहिल्यामुळे होते. तसेच, मधुमेहामुळे शरीराची ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते, परिणामत: वजन अनपेक्षितपणे कमी होऊ शकते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी स्नायू व फॅटवर ताण येतो. याव्यतिरिक्त, जेवणानंतर देखील सतत भूक लागणे हे देखील धोक्याचे लक्षण आहे, कारण शरीरातील पेशींना आवश्यक ग्लुकोज मिळत नसते. मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास होणारे हृदयविकार, मज्जातंतूचा ऱ्हास आणि व्हिज्युअल समस्या अशा दीर्घकालीन गुंतागूंतींचा धोका कमी करण्यासाठी या लक्षणांना लवकर ओळखणे, ज्यानंतर त्वरित निदान व केअर आवश्यक आहे.
सर्वांगीण व्यवस्थापन: होमिओपॅथी आणि समकालीन औषधोपचार
अलिकडील काळात, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी समकालीन पद्धतींसह होमिओपॅथिक उपचार करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अॅथेन्समध्ये करण्यात आलेल्या संशोधनामधून निदर्शनास आले की, होमिओपॅथी आणि प्रमाणित ओरल अॅण्टी-डायबेटिक औषधांच्या संयोजनामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये ९७ टक्के सुधारणा दिसण्यात आली, तुलनेत फक्त समकालीन औषधोपचार करण्यात आलेल्या रूग्णांमध्ये ४७ टक्के सुधारणा दिसण्यात आली. होमिओपॅथिक इन्सुलिन, अब्रोमा ऑगस्टा आणि युरेनियम नायट्रिकम यांसारख्या उपायांनी रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर व्यवस्थापन ठेवण्यामध्ये आणि अधिक प्रमाणात लघवी होणे व तोंड कोरडे पडणे अशा लक्षणांचे निराकरण करण्यामध्ये प्रभावी गुण दाखवले आहेत. पण, असे उपचार पात्र होमिओपॅथ्सच्या मार्गदर्शनांतर्गत करणे महत्त्वाचे आहे.
• ओट्स, फळे व भाज्या यांसारखे उच्च फायबरयुक्त खाद्यपदार्थ, विशेषत: कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ उदा. हिरवे वाटाणे, लेट्युस, सफरचंद व पेअर्स सेवन करा. प्रक्रिया केलेले व साखरयुक्त पदार्थ सेवन करणे टाळा.
• वजन आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे चालणे असे पुरेशा प्रमाणात व्यायाम करा.
• धूम्रपान व अधिक प्रमाणात मद्यपानामुळे मधुमेह-संबंधित गुंतागूंती वाढू शकते.
भारतासमोर मधुमेहाचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान आहे. समकालीन औषधोपचार, होमिओपॅथी आणि जीवनशैली बदल यांचे संयोजन मधुमेहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी उपुयक्त ठरू शकते.