Close

घरासाठी महिलांना मिळणार २ लाखांचा डिस्काऊंट : ‘द मॉल ऑफ होम्स’ची खास ऑफर (Women Buyers To Get Discount Upto 2 Lakhs : Exclusive Benefit Offer For Women)

येत्या रविवारी ‘द मॉल ऑफ होम्स’ या प्रदर्शनात महिलांना २ लाखांचा डिस्काऊंट देण्याची योजना आखण्यात आली आहे. स्वतःच्या नावाने घर खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी क्रेडाई- एमसीएचआयच्या ३२ व्या प्रॉपर्टी ॲन्ड होम फायनान्स एक्स्पोमध्ये बुकिंग करणाऱ्या महिलांसाठी वैध आहे. ही माहिती क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी दिली.

रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेतर्फे सदर प्रदर्शन १७ ते १९ जानेवारी दरम्यान जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यात शेवटच्या दिवशी पिंक संडेला ही आवास सवलत योजना लागू करण्यात येत आहे.

या प्रदर्शनात देशभरातील १०० विकासक आणि बांधकाम व्यावसायिक भाग घेणार असून ते आपले ५०० पेक्षा जास्त प्रकल्प सादर करणार आहेत. या ठिकाणी घर खरेदी करणाऱ्यांना सुवर्ण मुद्रा, मॉड्युलर किचन, मोटरबाईक्स अशा भेटींसोबतच स्टॅम्प ड्युटीमध्ये व जी.एस.टी मध्ये सवलती देण्याची या विकासकांनी घोषणा केली आहे. गृहकर्ज योजनांची माहिती देण्यासाठी २५ हून अधिक वित्तीय संस्थांचे स्टॉल्स यात असतील.

“१० मिनिटात तुमचे घर बुक करा – हा उपक्रम या प्रदर्शनात राबविण्यात येईल,” अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डोमिनिक रोमेल यांनी दिली. घरांचे नवीन प्रकल्प तसेच तयार प्रकल्पात सहभागी होण्याची संधी इथे घर खरेदीदारांना मिळणार आहे. तसेच २५ आर्किटेक्टस्‌चा सत्कार केला जाईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/