अभिनेत्री कंगना रणावत दसऱ्याच्या दिवशी दिल्लीतील लवकूश रामलीला येथे रावणदहनासाठी गेली होती. या ५० वर्षांच्या परंपरेत रावण दहन करणारी ती पहिली महिला ठरली. पण तिच्या रावण दहनावर सुब्रमण्यन स्वामींनी आक्षेप घेतला. कंगनाचा बिकिनीतील फोटो शेअर करत त्यांनी टिका केली.
त्यांनी लिहिले की, रामलीलेच्या शेवटच्या दिवशी त्यांना प्रमुख पाहुणे बनवणे हे श्री राम यांच्यासाठी अशोभनीय आहे.
यावर कंगनाने लगेचच एका ट्विटद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले की, 'स्विमसूटमधील फोटो आणि एका फाल्तू गोष्टीतून तुम्ही असे सुचवत आहात की राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी माझ्याकडे माझ्या शरीराशिवाय दुसरे काहीही नाही. मी एक कलाकार आहे, हिंदी चित्रपटांमसृष्टीतील आजवरची सर्वात महान कलाकार आहे, लेखक, दिग्दर्शक, निर्माती, क्रांतिकारी आहे. माझ्या जागी एखादा तरूण असता जो भविष्यातील महान नेता आणि मार्गदर्शक म्हणून पात्र ठरू शकला असता. तर मग राजकारणात येण्यासाठी तो कदाचित आपले शरीर विकत असेल असेच तुम्ही मानून चालला असता का ?
ती पुढे म्हणाली, 'खोलवर रुजलेली लैंगिकतेची पाळमुळं आणि स्त्री शरीराची लालसा तुम्हाला वाईट व्यक्ती बनवते. स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे मेंदू, हृदय, हात, पाय आणि पुरुषांप्रमाणेच इतर सर्व काही अवयव असतात. महान नेता होण्यासाठी हे महत्वाचे आहे.