- जिव्हाळा, आपलेपणा, काळजी आणि सहवास यांच्या सहाय्याने आपण कोणाचंही मन जिंकू शकतो; परंतु, नवर्याचं हृदय जिंकण्यासाठी खास कला अवगत असावी लागते.
- असं म्हणतात की प्रेमानं शत्रूलाही जिंकता येतं. घरी असो वा बाहेर रोज काही वेळ आपल्या पतीशी दोन शब्द प्रेमाने बोला. त्यामुळे नात्यात गोडवा राहतो.
- सकाळचा चहा आणि नाश्ता एकत्र करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसला जात असाल तर सोबतच घराबाहेर पडा. या लहानसहान सहवासातील आनंद मोठा असतो.
- कुठे जाताय? का जायचंय? अशा प्रश्नांची सरबत्ती झोडू नका. तक्रारीचा सूर लावू नका.
- वैवाहिक जीवनात काही अडचणी असल्यास इतरत्र चर्चा करू नका. त्याऐवजी वडीलधार्यांची वा विश्वासू काऊंसिलरची मदत घ्या.
- पती ऑफिसमधून आल्यानंतर त्याचं हसत स्वागत करा. त्याने त्याचा थकवा गेला पाहिजे.
- लग्न, समारंभ, मेजवानी अशा कार्यक्रमांना जाताना आपल्यासोबतच पतीने काय घालावे; याची सर्व तयारी करा.
- स्वादिष्ट भोजनाने मन जिंका. सर्वात गुणकारी.
- बर्याचदा नवरोबा हे ममाज् बॉय असतात. त्यामुळे बायकोमधे ते आईचे गुण शोधतात. असं असल्यास आपल्या सासूशी बोलून नवर्याची आवड काय ते जाणून घ्या आणि त्याप्रमाणे स्वतःला बदला. सासूकडून त्याच्या आवडीचं शिकून घ्या व बनवा.
- मूड खराब असताना प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. त्यांना रिलॅक्स व्हायला वेळ द्या. मग विचारा.
- पतीस कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल तर परत आल्यानंतर काही ना काही सरप्राइज द्या. उदा. त्यांच्या आवडीची साडी नेसून एकत्र फिरायला जा, चित्रपट पाहायला जा किंवा खास रेस्टॉरंटमध्ये डिनर प्लॅन करा.
- नवर्याला स्पोर्टस्चे वेड असेल तर कधी कधी त्याच्या सोबत बसून स्वतःही त्या खेळाचा आनंद घ्या.
- कामक्रीडेमधेही कोणत्या गोष्टींतून त्याला आनंद मिळतो, तुमच्याकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत ते सर्व जाणून घ्या व कृतीत आणा.
- एखाद्या संध्याकाळी केवळ दोघांनीच एकमेकांना वेळ द्या.
- सासरच्या सर्व मंडळींशी सामोपचाराने वागा. त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून, त्यांना काही ना काही गिफ्ट द्या.
- नणंद - दीर अशा कुटुंबातील सदस्यांना सणा-समारंभाच्या निमित्ताने घरी जेवणासाठी आमंत्रित करा.
- नेहमी नेहमी चांगलं वागलं पाहिजे असं नाही, संसारात कधी तरी लुटुपुटीचं भांडणं वा वाद झाला की नात्यातील गोडवा अधिक वाढतो.
- स्वतःला तसंच घरालाही नीटनेटकं ठेवा.
- चांगल्या गोष्टींकरिता कौतुक करा.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पटवून द्या की तुमच्या हृदयात त्यांचं स्थान अव्वल नंबरवर आहे. आपल्यावर प्रेम करणारी एवढी प्रेमळ पत्नी आपल्याला मिळाली ही जाणीव नातं अधिक घट्ट बनविते.
- सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे पतीच्या अधिकाराचा आदर ठेवा.
Link Copied