होलसम कोकोनट-पीनट सूप
साहित्य : 1 वाटी नारळाचं दूध, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धा टीस्पून खसखस, पाव कप भाजलेले पोहे, अर्धा टीस्पून तूप, 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 काकडी बारीक चिरलेली, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, स्वादानुसार मीठ.
कृती : नारळाचं दूध, शेंगदाणे, खसखस, पोहे एकत्रितपणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नॉनस्टिक पॅन गरम करून, त्यात तूप घाला. त्यावर जिरं, हिंग आणि चिली फ्लेक्सची फोडणी करा. फोडणी दोन सेकंद परता. मग त्यात शेंगदाणे-खसखस-पोह्याचं वाटण घाला. नंतर बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो घाला. आवश्यकतेनुसार पाणी आणि स्वादानुसार मीठ घालून चांगली उकळी येऊ द्या. गरमागरम सूपवर कोथिंबीर पेरा आणि सर्व्ह करा.