Close

वांग्याचे भरीत व मावा-मटार (Wange Bharit and mava-Matar)

वांग्याचे भरीत
साहित्यः 1 मध्यम आकाराचे काळे वांगे, प्रत्येकी 1 बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व हिरवी मिरची, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद, 3 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार. कोथिंबीर व मीठ चवीनुसार.
कृतीः वांग्याला थोडेसे तेल लावून मंद आचेवर भाजून घ्या. वांग्याचे साल काढा. वांग्याचा गर मॅश करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून हिरवी मिरची व कांदा टाकून परतून घ्या. लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला, मीठ व टोमॅटो टाकून शिजवा. कोथिंबिरीने सजवून गरम-गरम सर्व्ह करा.

मावा-मटार
साहित्यः 250 ग्रॅम मटार, 50 ग्रॅम काजू, 3 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, 50 ग्रॅम मावा, 100 मि.ली. दूध, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून कोथिंबीर.
कृतीः मटार उकडून घ्या. कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून हिंग, जिरे व तमालपत्र टाका. कांद्याची पेस्ट टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोची पेस्ट व सगळे मसाले टाकून परतून घ्या. मावा, दूध, मटार व काजूचे तुकडे टाकून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

Share this article