Close

आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन (Vidyadhar Joshi returns to serials after battling a life-threatening illness)

स्टार प्रवाहच्या येडं लागलं प्रेमाचं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लवकरच मालिकेत अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. जीजी म्हणजेच उमाचा हा भाऊ आयुर्वेदिक औषधांचा जुना जाणकार असून मंजिरीचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळामामा पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने कर्मठ, अभिमानी, परखड आणि स्पष्टवक्ता असलेल्या बाळामामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे. उमाला तू चुकते आहेस असं तोंडावर सांगू शकणारा बाळामामा तेवढाच लाघवी आणि प्रेमळ आहे.

बाळामामाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी जीवघेण्या आजारावर मात करुन जवळपास २ वर्षांनंतर पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके बाप्पा जोशी आता येड लागलं मालिकेच्या माध्यमातून एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील. याविषयी सांगताना ते म्हणाले दोन वर्षांनंतर आवडीचं काम करताना मला अतिशय आनंद होतोय. मनाला आतून उभारी येतेय असं वाटतं.

माझ्या नशिबाने सेटवरची सगळीच मंडळी माझी काळजी घेत शूटिंग करत आहेत. स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी देखिल प्रचंड मानसिक आधार दिला. गेली दोन अडीच वर्ष आजारपणामुळे मी अभिनय क्षेत्रापासून लांब होतो. मात्र आता माझी प्रकृती उत्तम आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करत आहे. येड लागलं प्रेमाचं मालिकेतला बाळा मामा प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका येड लागलं प्रेमाचं रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Share this article