Close

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन (Veteran Actress Suhasini Deshpande Passed Away)

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुहासिनी देशपांडे यांच्या मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून अभिनय विश्वात करियरला सुरुवात केली. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही.

सुहासिनी देशपांडे यांनी तब्बल ७० वर्षांपेक्षा अधिक काळ अभिनय विश्वात काम केलं. सुहासिनी देशपांडे यांनी त्यांच्या करियरमध्ये १०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शापथ (2006) चिरंजीव (2016), ‘ढोंडी’ आणि 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाकाल’ सिनेमात सुहासिनी देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अभिनेता अजय देवगन स्टारर ‘सिंघम’ सिनेमात देखील सुहासिनी देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘सिंघम’ सिनेमात सुहासिनी देशपांडे यांनी अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या आजीची भूमिका बजावली होती. ‘सिंघम’ सिनेमानंतर सुहासिनी देशपांडे कोणत्याच सिनेमात दिसल्या नाहीत. ‘सिंघम’ सिनेमाच सुहासिनी देशपांडे यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाने सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनानंतर अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तर पुण्यात सुहासिनी देशपांडे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. आज २८ ऑगस्ट रोजी सुहासिनी देशपांडे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Share this article