व्हेज मिली-जुली
साहित्यः 100 ग्रॅम कोबी, 100 ग्रॅम गाजर, 100 ग्रॅम मटार, 50 ग्रॅम पनीर, 25 ग्रॅम उकडलेले नूडल्स, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 25 ग्रॅम मावा, 1 टीस्पून आलं-लसूण व हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट किचन किंग मसाला, मीठ चवीनुसार, दीड टेबलस्पून तेल, लोणी व क्रीम.
कृतीः एका पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या. चिरलेला कांदा टाकून परता. आता टोमॅटो टाका. तेल सुटल्यावर कोबी, गाजर, मटार टाका. यात धणे पूड, लाल मिरची पूड, मीठ, एव्हरेस्ट किचन किंग मसाला टाका. 2-3 मिनिटे शिजवा. शिजल्यानंतर पनीर टाका. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करा. उकडलेले नूडल्स टाका. लोणी व क्रीमने सजवून सर्व्ह करा.
दुधी मसाला
साहित्यः 500 ग्रॅम दुधी, 100 ग्रॅम कांदे, 50 ग्रॅम तेल, मीठ, लाल मिरची पूड, धणे पूड, हळद.
कृती: दुधी सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. कांदा चिरून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यात मीठ, लाल मिरची पूड, धणे पूड व हळद टाका. कढईत तेल गरम करून कांद्याची पेस्ट परतून घ्या. हा मसाला दुधीच्या तुकड्यांमध्ये भरा. कढईत तेल गरम करून दुधी टाका व झाकण लावून शिजवा. थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहा. गरम-गरम सर्व्ह करा.