व्हेज लाजवाबी
साहित्य: 100 ग्रॅम मिक्स भाज्या (फरसबी, गाजर, फ्लॉवर व भोपळी मिरची), 2 टोमॅटो, 2 कांदे, एक क्यूब चीज, 1 टीस्पून लाल मिरच्यांची पेस्ट, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, दीड टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट गरम मसाला व मीठ चवीनुसार.
कृती: सगळ्या भाज्या उकडून घ्या. कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाका. वाटलेला कांदा व टोमॅटो घालून परतून घ्या. लाल मिरचीची पेस्ट व उकडलेल्या भाज्या परतून घ्या. यात मीठ, हळद, मिरची, धणे पूड, जिरे पूड व एव्हरेस्ट गरम मसाला घालून 5-7 मिनिटे शिजवा. किसलेले चीज टाका. टोमॅटो व भोपळी मिरचीने गार्निश करून सर्व्ह करा.
हरियाली मसाला
साहित्य: 50 ग्रॅम पनीर, प्रत्येकी 50 ग्रॅम फरसबी, गाजर, फ्लॉवर व मटार, 1 जुडी पालक, 100 ग्रॅम काजू पेस्ट,
25 ग्रॅम मावा, 1 टेबलस्पून तेल, 1 चिरलेला कांदा, 2 टोमॅटो, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, लाल मिरची पूड, धणे पूड, 1 टीस्पून गरम मसाला व चाट मसाला.
कृती: सर्व भाज्या चिरून उकडून घ्या. पालक उकडून वाटून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात आलं लसूण पेस्ट घालून परता. कांदा घालून परता. टोमॅटो व काजू पेस्ट घालून परता. त्यात सर्व उकडलेल्या भाज्या व पालक पेस्ट घाला. यात मीठ, लाल मिरची पूड, हळद, चाट मसाला, गरम मसाला व कोथिंबीर घालून थोडा वेळ शिजवा. मावा घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. क्रीम व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा. .