व्हेेज जयपुरी साहित्य: प्रत्येकी 100 ग्र्रॅम फ्लॉवर, गाजर, मटार, कोबी, फरसबी व भोपळी मिरची, 150 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम खसखस, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरचीची पेस्ट, 100 ग्रॅम मावा, 2 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून मलई, 1 टेबलस्पून काजू पावडर, 1 टीस्पून एव्हरेस्ट सब्जी मसाला, चिमूटभर जिरे, 1-2 पापड, मीठ चवीनुसार व चिरलेली कोथिंबीर. कृती: सगळ्या भाज्या उभ्या चिरून उकडून घ्या. काजू व खसखस 5 मिनिटे वेगवेगळे पाण्यात भिजवून ठेवा. काजू उकडून घेऊन खसखस सोबत वाटून घ्या. कढईत तेल गरम करून कांदा टाका. सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यात हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. टोमॅटो घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ व एव्हरेस्ट सब्जी मसाला टाका. काजू पेस्ट टाकून परता. यात मावा व बटर टाका. मलई व काजू पावडर टाका. उकडलेल्या भाज्या टाकून 2-3 मिनिटे शिजवा. कोथिंबीर टाका. पापडाच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.
गाजर व फरसबीची भाजी
साहित्यः 100 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम फरसबी, 2 टीस्पून तेल, 1 टीस्पून राई, 2 हिरवी मिरची, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून कोथिंबीर.
कृतीः गाजर व फरसबी बारीक कापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून राईची फोडणी द्या. गाजर व फरसबी टाका. सगळे मसाले टाकून मंद आचेवर शिजवून घ्या. भाज्या शिजल्यानंतर कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
Link Copied