Close

व्हेज फ्लोरेनटिन व मॅक्रोनी (Veg Florentine And Macaroni)

व्हेज फ्लोरेनटिन
साहित्य: 1 गाजर, 1 फ्लॉवर, 4 फरसबी, 50 ग्रॅम मटार, 1 जुडी पालक. व्हाइट सॉससाठी: 50 ग्रॅम मैदा, 2 टेबलस्पून लोणी किंवा तूप, 1 टीस्पून दूध, बेक करण्यासाठी चीज, चिमूटभर काळी मिरी पूड, मीठ चवीनुसार.
कृती: सर्व भाज्या चिरून उकडून घ्या. पालकची पेस्ट बनवा. कढईत तूप गरम करून मैदा खरपूस भाजून घ्या. दूध घालून घट्ट होईपर्यंत ढवळा. चवीप्रमाणे मीठ व काळी मिरी पूड घाला. एका डिशमध्ये पालक पेस्ट टाकून त्यावर उकडलेल्या भाज्या टाका. वरून व्हाइट सॉस टाकून, चीज किसा. ओव्हनमध्ये 2-3 मिनिटे बेक करून सर्व्ह करा.

मॅक्रोनी
साहित्य: 100 ग्रॅम मॅक्रोनी, 1 बारीक चिरलेला कांदा, प्रत्येकी 1 लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची, 2 टेबलस्पून टोमॅटो केचअप, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, चिमूटभर सफेद मिरी पूड, 1 टेबलस्पून लोणी किंवा तूप, 10 ग्रॅम किसलेले चीज, मीठ चवीनुसार.
कृती: अधार्र् लीटर पाण्यात मॅक्रोनी उकडून पाणी गाळून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून कांदा, तिन्ही भोपळी मिरच्या घालून परता. टोमॅटो केचअप, लाल मिरची पूड, सफेद मिरी पूड व मीठ टाका. थोड्या वेळाने मॅक्रोनी टाका. कांद्याच्या पातीने सजवून सर्व्ह करा.

Share this article