Close

व्हेज दिलरुबा व कांदा-बटाटा-मेथी (Veg Dilruba And Onion-Potato-Methi 1)

व्हेज दिलरुबा
साहित्यः 50 ग्रॅम फरसबी, 50 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम फ्लॉवर, 50 ग्रॅम कोबी, 50 ग्रॅम मटार, 10 ग्रॅम काजू पावडर, 1 कांदा, 2 टोमॅटो, अर्धा टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 100 ग्रॅम काजूची पेस्ट, मीठ चवीनुसार, लाल मिरची पूड, चिमूटभर हळद, चाट मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, थोडेसे बटर किंवा क्रीम व मीठ चवीनुसार.
कृतीः सर्व भाज्या अर्ध्या कच्च्या उकडून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाका. बारीक चिरलेला कांदा टाकून परता. टोमॅटो व काजू पेस्ट टाकून परतून घ्या. उकडलेल्या भाज्या टाका. काजू पावडर, गरम मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला, लाल मिरची पूड, हळद व मीठ घालून 3-4 मिनिटे शिजवा. लोणी, क्रीम व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

कांदा-बटाटा-मेथी
साहित्य: 100 ग्रॅम उकडलेले बटाटे, 50 ग्रॅम बारीक चिरलेली मेथी, 100 ग्रॅम बारीक चिरलेले कांदे, 10 ग्रॅम लसूण, चिमूटभर राई, चिमूटभर जिरे, 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून लाल मिरची, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून साजूक तूप, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धणे पूड, मीठ चवीनुसार.
कृती: कढईत तेल गरम करून राई व जिर्‍याची फोडणी द्या. मेथी, कांदा व बटाटे परतून घ्या. यात हळद, लाल मिरची पूड, साजूक तूप, आमचूर व धणे पूड टाका. चवीनुसार मीठ घालून शिजवा.

Share this article