Close

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर (Union Cabinet Approved Granting Classical Language Status To Marathi)

केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो."

अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात, “अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जगभरातील मराठी लोकांच्या वतीने मोदीजींचे आभार मानले आहेत. "नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल झाल्यानिमित्ताने मराठी कलाकार आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते लोकप्रिय संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानिमित्ताने आनंद व्यक्त केला आहे. सलील कुलकर्णी म्हणाले, “मित्रांनो अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो, ज्या भाषेमध्ये आपण वेदना व्यक्त करतो, ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण ही माझ्यासाठी, सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळे आपल्या भाषेची पोरं आहोत.”

पुढे सलील कुलकर्णी म्हणाले, “लहानपणापासून आपण ज्या भाषेचा चष्मा लावून जगाकडे बघितलं, ती भाषा जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवते तेव्हा आपल्या सगळ्यांना मनापासून समाधान वाटतं. गेली २७, २८ वर्ष मराठी कविता, मराठी गाणी गाण्याचा जो आनंद मिळाला. तर आज हा आनंद द्विगुणित झाला आहे आणि यानिमित्ताने ज्या, ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपली मराठी भाषा जपली, वेचली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. त्या सगळ्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. कारण त्या सगळ्यांमुळे मराठी भाषा आपल्या पिढीपर्यंत पोहोचली. त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि भाषेला नमस्कार करतो. ज्यांनी, ज्यांनी प्रयत्न करून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार,”

अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर सुबोधने लिहिलं आहे, “अभिजात भाषा, मराठी भाषा! केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन.”

तसंच लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धनच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल…आता आपली मराठी बोलण्याची, वाचण्याची, पाहण्याची, जपण्याची जबाबदारी वाढलीय….फक्त उत्सव नाही, जगण्यात मराठी आणूया…फक्त प्रमाण नाही, बोलीत मराठी सजवूया…फक्त जुनं नाही, नवीन कला, साहित्य घडवूया…फक्त जपणूक नाही, मराठी चौफेर वाढवूया…”

याशिवाय, “आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. खूप आनंद होतोय. मायमराठी,” अशी पोस्ट संदीप पाठकने लिहिली आहे. तसंच अभिनेता जयेश जाधव, अंकुर वाढवे, राजेश देशपांडे, सोनाली कुलकर्णी, मेघा धाडे, अशा अनेक कलाकारांनी आपला आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.

समस्त मराठी जनांचे अभिनंदन!

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/