Close

दोन जागतिक जेतेपदाची मानकरी केटी मून, मुंबई मॅरेथॉनची सदिच्छा दूत (Two- Time Pole Vault World Champion And Olympic Medal Athlete Katie Moon Is Mumbai Marathon Ambassador)

दोन वेळची जगज्जेती आणि २०२० ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती पोल व्हॉल्टपटू कॅटी मून ही रविवार, २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या १९व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर असेल. प्रोकॅम इंटरनॅशनल आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन ही जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रेस आहे.

ऑगस्ट महिन्यात बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत कॅटीने प्रतिस्पर्धी खेळाडू ऑस्ट्रेलियाची निना केनेडी हिच्यासोबत सुवर्णपदक विभागून घेतले. जागतिक स्पर्धेत प्रथमच असे पाहायला मिळाले. यामुळे तिच्या मनात पोल व्हॉल्ट खेळाबद्दल आणि तिच्या सहकारी स्पर्धकाबाबत आदर निर्माण झाला. अमेरिकेची ही ३२ वर्षीय पोल वॉल्टर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखण्यासाठी आतुर आहे. कॅटी हिच्या नावावर जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये एकूण तीन पदके आहेत. त्यात बुडापेस्ट आधी बेलग्रेडमधील २०२२ वर्ल्ड इनडोअर स्पर्धेतील रौप्य तसेच २०२२ यूजीन ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाचा समावेश आहे. याशिवाय मून हिने २०१८ डायमंड लीगमध्ये दोन सुवर्णपदके मिळवलीत.

टाटा मुंबई मॅरेथॉनची इंटरनॅशनल इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून निवड होणे हा मोठा सन्मान समजते, असे कॅटी मून हिने म्हटले आहे. प्रत्येकाचे जीवन ही एक रेसच आहे. ही रेस धावतानाच्या प्रत्येक पावलामध्ये प्रेरणा बनण्याची आणि आमुलाग्र बदल घडवून आणण्याची संधी असते.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही जगातील अव्वल १० मॅरेथॉनपैकी एक आहे. या मॅरेथॉनमध्ये एकूण ४०५,००० अमेरिकन डॉलर रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Share this article