Close

दोन वर्षातच मोडले पवित्र रिश्ता फेम करणवीर मेहराचे लग्न, ५ वर्षांपूर्वी घेतलेला पहिल्या पत्नीशी घटस्फोट(Tv Couple Karan Veer Mehra & Nidhi Seth Get Divorced)

टीव्हीचे प्रसिद्ध जोडपे करण वीर मेहरा आणि निधी सेठ वेगळे झाले आहेत. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनी आता त्यांनी घटस्फोट घेतला.

दोघांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले, त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

निधीने ETimes शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निधीने सांगितले की त्यांचा घटस्फोट तीन महिन्यांपूर्वीच झाला होता आणि दोघेही एक वर्षापासून वेगळे राहत होते. निधी म्हणाली की, कोणत्याही नात्यात रोजची भांडणे सहन होत नाहीत. अशा परिस्थितीत एकत्र राहणे शक्य नसते. कोणत्याही वैवाहिक जीवनात मानसिक शांती, एकमेकांचा आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे असते.

करणचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न 2009 मध्ये त्यांची बालपणीची मैत्रिण देविकासोबत झाले होते आणि 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

निधी आणि करण 2008 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. त्यानंतर तीन वर्षांनी ते दुसऱ्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले. मैत्री झाली आणि मग प्रेम झालं. दोघांनी लग्न केले आणि आता वेगळेही झाले.

निधी म्हणते की, कोणत्याही नात्यात येण्यापूर्वी अनेक गोष्टींचा नीट आणि खोलवर विचार केला पाहिजे. सध्या निधी तिच्या पालकांसोबत बेंगळुरूमध्ये आहे आणि करण त्याच्या बातें कुछ अनकही सी या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. निधी म्हणाली की ती मुंबईला मिस करत आहे. तिला अभिनयाची चांगली ऑफर मिळाल्यास ती नक्कीच मुंबईत परत येईल, परंतु सध्या ती ब्रेकवर आहे आणि या वेळेचा आनंद घेत आहे. ती सध्या तिच्या इंटिरियर डिझायनिंग करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

निधीने श्रीमद भागवत महापुराण, किस्मत का खेल आणि मेरे डॅड की दुल्हनमध्ये काम केले आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/