Close

प्राजक्ता माळी अभिनित ‘फुलवंती’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शित (Title Track Of Historical Marathi Movie ‘Phullwanti’ Released : Prajakta Mali Plays The Title Role)

पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची.... रंभा जणू मी देखणी”… असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी; ११ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात.

पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’चे अस्मानी सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्यांचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ ह्या शीर्षकगीतातून होणार आहे.

गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे ह्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत; आर्या आंबेकर हिने गायले असून गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत ह्यांनी हे गाणे संगीतबद्ध केलेले आहे; तसेच उमेश जाधव ह्यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी ह्यांची ‘फुलवंती’च्या रूपातील अदाकारी ह्यांनी ह्या शीर्षकगीताला चारचांद लावले आहेत.

‘फुलवंती’ हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून ह्या चित्रपटातील सर्वात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे संगीत दिग्दर्शकांची आणि म्हणूनच ‘फुलवंती’विषयी अविनाश-विश्वजित म्हणतात की, ‘फुलवंती’ च्या गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधुर संगीत ह्यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि त्यासाठी केलेली मेहनत आजपासून प्रेक्षक अनुभवणार आहेत; ह्याची खूप उत्सुकता आहे. तसेच ही पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.

https://youtu.be/av7R7-hP8cw?si=bNdeVcE2ddBBUjRq

‘फुलवंती'..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ती सादर करत आहेत. मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/