Close

यंदाच्या दिवाळीत ‘टायगर 3’ आणि ‘द मार्वेल्स’ या थरारपटाची आतशबाजी होणार (Tiger 3″ Roars And ‘The Marvels’ Soars  : 2 Action Movies To Hit Big Screen This Diwali )

सलमान खानची धडाकेबाज भूमिका असलेला ‘टायगर 3’ आणि सुपर हिरोंचे कारनामे असलेला ‘द मार्वेल्स’ असे २ थरारक ॲक्शनपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेमीना बॉलिवूड आणि हॉलिवूडची आतशबाजी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. टायगर ३, नोव्हेंबर च्या १२ तारखेला, तर द मार्वेल्स १० नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

‘टायगर 3’ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा दिसेल. ‘टायगर’ चित्रपट मालिकेतील हा तिसरा चित्रपट असून यात सलमान रॉ एजन्टची भूमिका साकार करत आहे. या स्पाय थ्रीलरचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो पाहून सिनेप्रेमीना चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.

१० नोव्हेंबरला हॉलिवूडचा ‘द मार्वेल्स’ हा धडाकेबाज ॲक्शनपट प्रदर्शित होईल. त्यामध्ये सुपरहिरोंची थरारक कामगिरी बघायला मिळेल. यामध्ये ब्री लार्सन आपल्या लोकप्रिय अवतारात तिप्पट शक्तीने मोनिका रांबे व मिस मार्वेल यांच्यासोबत दिसेल. विशेष म्हणजे हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी, तामिळ व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार असून ‘टायगर 3’ हिंदीसह तामिळ व तेलगू मध्ये प्रदर्शित होईल.

Share this article