ठरलं तर मग मालिकेतला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे. अमित एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्यासोबतच त्याला बासरी वादनाची कलाही अवगत आहे. नुकतंच आता होऊ दे धिंगाणामध्ये बासरीवादन करुन त्याने सर्वांचीच मनं जिंकली.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-18-800x533.png)
बासरीवादनाची आवड कशी निर्माण झाली याविषयी सांगताना अमित म्हणाला, ‘मी कॉलेजमध्ये असतानाच बासरी वादन शिकलो. पूर्वी आम्ही डोंबिवलीमध्ये रहायचो. तिथे एक स्वामीनारायण मंदिर होतं. माझं बऱ्याचदा या मंदिरात जाणं व्हायचं. या मंदिरात महापुरुषदास स्वामींचं बासरीवादन पाहून मी तल्लीन होऊन जायचो. खरतर त्यांचे हे जादुई सूर पाहुनच मलाही बासरी वादनाची आवड निर्माण झाली. मी त्यांच्याकडुनच बासरी वादनाचे धडे गिरवले.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-19-800x533.png)
महापुरुषदास स्वामी यांनी पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याकडून ही कला अवगत केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यासोबत मी देखिल जायचो. बासरी हे आपलं प्राचीन वाद्य आहे. असं म्हणतात की, वाद्याला तुम्ही निवडत नाही. तर वाद्य तुम्हाला निवडतं. माझ्यासोबतही काहीसं असंच झालं. मी बरीच वर्ष माझी ही कला जोपासत होतो. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर यात खंड पडला. मात्र स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर मला माझ्या कलेशी भेट घडवून दिली.