Close

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण (Thackeray Family Son Aaishvary Thackeray Bollywood Debut In 2025)

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, नातू आदित्य ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे चालवताना दिसत आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांना एक नातू आहे, जो राजकारणात नव्हे तर बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास सज्ज झाला आहे. ऐश्वर्य ठाकरे असे त्यांच्या नातवाचे नाव असून २०२५ मध्ये त्याचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

ऐश्वर्य ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा जयदेव आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. स्मिता आणि जयदेव यांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला. आता त्यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. मात्र, ऐश्वर्यला कोणत्या दिग्दर्शकाने लाँच केले आहे आणि त्याच्या चित्रपटाचे नाव काय आहे याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.

ऐश्वर्य हा पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असला तरीही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसतात. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात ही ऐश्वर्य असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने या संधीचे सोनं केलं असे म्हणायला हरकत नाही.

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच ऐश्वर्यला अभिनयात करिअर करायचे होते. महाविद्यालयात असताना त्याने अनेक नाटकांमध्ये काम केल्याचे त्याच्या सोशल मिडिया पोस्टवरुन स्पष्ट होते. याशिवाय गेली काही वर्षे तो चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षणही घेतले आहे.

Share this article