तवा भेंडी
साहित्य: 250 ग्रॅम भेंडी, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून एव्हरेस्ट जिरे पूड, 1 टीस्पून आमचूर पावडर, 2 टेबलस्पून तेल व मीठ चवीनुसार.
कृती: भेंडी धुवून पुसून घ्या. भेंड्यांना मधोमध चीर द्या. लाल मिरची पूड, एव्हरेस्ट जिरे पूड, धणे पूड, आमचूर पावडर, मीठ व 2 टेबलस्पून तेल टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण भेंड्यात भरा. तव्यावर थोडेसे तेल टाकून भेंडी कुरकुरीत व खरपूस होईपर्यंत शिजवा.
लसुणी पालक
साहित्यः 200 ग्रॅम पालकाची पेस्ट, 100 ग्रॅम चिरलेला पालक, 25 मि.ली. तेल, पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून राई, 25 ग्रॅम कांदे, प्रत्येकी 1 टेबलस्पून ( बारीक चिरलेले) लसूण, आलं व टोमॅटो, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, प्रत्येकी अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, धणे पूड, बारीक चिरून तळलेला लसूण, चिमूटभर हळद व हिंग, 50 ग्रॅम टोमॅटो प्युरी, 30 ग्रॅम दही, 20 मि.ली. क्रीम, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः पॅनमध्ये तेल गरम करून राई व जिरे टाका. जिरे तडतडल्यानंतर हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची व कांदा घालून परता. कांदा सोनेरी झाल्यावर चिरलेला पालक व टोमॅटो टाका. भाजीला तेल सुटेपर्यंत शिजवा. इतर मसाले टाकून परतून घ्या. आता पालक प्युरी, टोेमॅटो प्युरी, दही व क्रीम टाका. तळलेल्या लसणाने गार्निश करून सर्व्ह करा.