* आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण काय नाही करत. पण काही पदार्थ आपला निग्रह मोडून काढतात. तरी काही सोप्या कल्पना लढवून आपण यावर मात करू शकतो. * तुम्हाला आवडणार्या पदार्थांचा जरूर आस्वाद घ्या. पण योग्य प्रमाणात. मिठाई खात असाल तर पूर्ण तुकडा खाण्याऐवजी अर्धाच खा. * घरात मैदा, बेसनच्या चटपटीत पदार्थांऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीचे नमकीन ठेवा. ते चवीला चांगले असण्याबरोबरच पौष्टीक देखील असतात. * मधल्या वेळेत भूक लागल्यावर तळलेले पदार्थ खाण्याऐवजी कडधान्यांची भेळ, फळे खा. * पनीर आवडत असेल तर सोया पनीर किंवा लो फॅट पनीरचा वापर करा. त्यामुळे पनीरची चव तर मिळेलच आणि वजनही नाही वाढणार. * साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करा. * लो फॅट दूध वापरलेले जास्त चांगले. * सॅन्डविच, भेळ यासारखे पदार्थ घरी बनवून खालेले जास्त उत्तम. ते जास्त पौष्टीक असतात. * कोणताही पदार्थ बनवताना (विशेष करून तुमच्या आवडीचा) कमी प्रमाणात बनवा. त्यामुळे तुमच्याकडून अती खाल्ले देखील जाणार नाही. * पदार्थ तळून खाण्याऐवजी उकडून, भाजून खा. * आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ शक्यतो पारदर्शक बरण्यांमध्ये ठेऊ नका. त्यामुळे ते चटकन दिसणार नाहीत व खाण्याची इच्छा होणार नाही. * खाऊचे डबे जरा उंचावर किंवा लांब ठेवा. त्यामुळे ते काढताना तुमच्या शरीराची हालचाल होईल.
Link Copied