साहित्य : सारणासाठी : 1 वाटी खवलेले खोबरे, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी मनुके, मीठ, साखर.
आवरणासाठी : 250 ग्रॅम रताळी, 1 मोठा बटाटा, थोडेसे मीठ.
कृती : रताळी व बटाटे उकडून घ्यावेत त्याची साले काढवीत. हाताने चांगले कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. यात थोडे मीठ घालून पुन्हा चांगले एकजीव करावे. कढईत थोडेसे तूप गरम करून मिरच्यांचे बारीक तुकडे चांगले परतून घ्यावेत. गॅस बंद करून यात खोवलेले खोबरे, मनुके, साखर व चवीनुसार मीठ टाकून सारण एकजीव करून घ्यावे. बटाटा व रताळ्याच्या मिश्रणाची जाडसर पारी करून त्यात भरावे. वरीच्या पिठात घोळवून या कचोर्या तुपात तळाव्यात. गरमागरम रताळ्याची कचोरी सर्व्ह करावी.
रताळ्याची कचोरी (Sweet Potato Kachori)
Link Copied