स्वीट कॉर्न सूप
साहित्यः 2 कप स्वीट कॉर्नचे दाणे, 1 टीस्पून बटर, 2 ते 3 टेबलस्पून भोपळी मिरची, 2 ते 3 टेबलस्पून गाजर,2 टेबलस्पून कोबी, 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, पाव टीस्पून पांढरी मिरपूड, चवीपुरते मीठ, टीस्पून साखर, पातीच्या कांद्याचा हिरवा भाग सजावटीसाठी.
कृती: स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून शिजवून घ्या. 2 पैकी दीड वाट्या स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक भोकाच्या चाळणीवर गाळून घ्या. कढई गरम करून त्यात बटर घालावे. भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून मिनिटभर परतावे. आता गळलेली प्युरी आणि उरलेले अधार्र् कप अख्खे दाणे घालावे. लहान वाटीत कॉर्न फ्लोअर आणि अधार्र् कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. सूपला उकळी आली की त्यात दाटसरपणासाठी कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे.
मीठ, साखर आणि मिरपूड घालावी. मध्यम आचेवर मिनिटभर उकळी काढावी. सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये वाढावे. कांद्याची पात बारीक चिरून सजवावे. गरमच सर्व्ह करावे.