सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला त्याचा पॉडकास्ट 'द रणवीर शो' सुरू ठेवण्याची परवानगी दिली. तथापि, न्यायालयाने एक अट घातली की तो त्याच्या शोमध्ये काहीही अश्लील दाखवणार किंवा बोलणार नाही. युट्यूबरने न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा शो प्रसारित करण्यापासून रोखणाऱ्या आदेशाचा एक भाग काढून टाकण्याची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया याला अखेर दिलासा दिला आहे. त्याचा युट्युब शोला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे रणवीर अलाहाबादिया याचा ‘द रणवीर शो’ या शोचे प्रसारण पुन्हा एकदा सुरु होणार आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयाने एक अट देखील ठेवली आहे.

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमध्ये स्वत:च्या पालकांविषयी अश्लाघ्य भाषेत कमेंट केल्यानंतर देशभरात टीकेच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या युट्युबर रणवीर अलाहाबादिया याला अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याचा ‘दि रणवीर शो’ नावाचा शो सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. अलाहाबादिया याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा शो आपल्या रोजीरोटीचा एकमेव मार्ग असून आपल्या शो अपलोड करण्याची परवनगी द्यावी अशी मागणी युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने केली होती. या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने अर्ज मंजूर करीत शो सुरु करण्यास सशर्त परवागनी दिली आहे.
या आधी सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रणवीर अलाहाबादिया याच्या याचिकेला विरोध करताना म्हटले की ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ मधील त्यांची टीपण्णी अश्लील आणि अनुचित होती. त्याच्या शो सुरु करण्याच्या मागणीला उत्तर त्याला काही काळ शांत राहण्यास सांगा अशी मागणी केली होती, परंतू सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात शोला न रोखता केवळ शोचा कंटेन्ट शालीन असावा असे आदेश देत रणवीर अलाहाबादिया यास दिलासा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया याला सध्या परदेश प्रवासाची अनुमती नाकारत त्याला तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे. रणवीर अलाहाबादिया याला ‘दि रणवीर शो’ मध्ये या प्रकरणाबाबत बोलण्यास देखील मनाई केली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडियावर सामग्री कोणती असावी या संदर्भात दिशा- निर्देश तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा हितधारकांचा सल्ला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. नैतिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यात संतुलन बनविण्याची गरज असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याआधी ३२ वर्षीय युट्युबर रणवीर अलाहाबादिया याला सर्व प्रकाराचे शो अपलोड करण्यास मनाई केली होती. या ताज्या आदेशात दि रणवीर शो पुन्हा सुरु करण्याचे परवागनी देताना कोर्टाने म्हटले की अलाहाबादिया याला एक वचन द्यावे लागेल. त्याच्या शोमध्ये शालीनता आणि नैतिकता असावी समाजातील सर्व वयोगटातील लोकांना हा शो पाहता यावा असा त्याचा कटेन्ट असावा.
BeerBiceps Guy नावाने प्रसिद्ध असलेल्या अलाहाबादिया याने गेल्या महिन्यात ‘इंडियाज् गॉट लेटेंट’ एका एपिसोडमध्ये अश्लील वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशात त्याच्या विरोधता संतापाची लाट उठली होती. कॉमेडियन समय रैना याने होस्ट केलेल्या या शोमध्ये अलाहाबादिया याने एका उमेदवारावाला प्रश्न विचारताना तुम्ही तुमच्या आई-वडीलांना उरलेल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी सेक्स करताना पसंद कराल की एकदा सामील होऊन त्यास कायमचा बंद कराल ? असा प्रश्न विचारला होता.