कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीमध्ये दिलेल्या लक्षणीय योगदानासाठी पुण्यातील प्रतिष्ठित टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अलिकडेच त्यांना मानद डॉक्टरेट, डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी प्रदान केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली कायनेटिक ग्रीनने केवळ शहरी ग्राहकांनाच सबल बनविलेले नाही तर ग्रामीण भारतातील विशाल लोकसंख्येलाही वाहतुकीची साधने पुरविली आहेत व त्यांना अधिक स्वच्छ, अधिक पर्यावरणस्नेही आणि एक अत्यंत किफायतशीर असे खासगी वाहतुकीचे साधन देत सक्षम बनविले आहे. शाश्वत वाहनसुविधेचे लोकशाहीकरण करणे आणि ती प्रत्येक भारतीयाला सहज, परवडण्याजोग्या किंमतीत आणि व्यवहार्य पद्धतीने उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे.
आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये राज्य स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या व गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या श्रीम. सुलज्जा यांनी पेनसिल्व्हानिया, यूएसए येथील प्रतिष्ठित कार्नेजी मेलन विद्यापीठातून एमबीए केले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (SMEV), इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) अशा अनेक संघटनांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेला त्यांच्या व्यावसायिक कुशलतेची व असाधारण दृढनिश्चयाची जोड मिळाल्याने केवळ अपवादात्मकरित्या चांगले व्यावसायिक परिणाम प्राप्त झाले नसून त्यांनी आपल्या कामाने, आपल्या प्रज्ञेने व मूलत: पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात एका ईव्ही कंपनीच्या संस्थापक म्हणून आपल्या स्थानाद्वारे कित्येक युवा स्त्री उद्योजकांच्या व कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे. ही डॉक्टरेट म्हणजे त्यांचा स्वत:वरील विश्वास व ईव्ही उद्योगक्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला परिवर्तनकारी दृष्टिकोन यांचीच पोचपावती आहे.

श्रीम. सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्याबरोबर पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रविंद्र प्रभूदेसाई आणि प्रख्यात अभिनेता व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. दीपक जे. टिळक यांच्या उपस्थितीत डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव राष्ट्रउभारणीप्रती कटिबद्ध असलेले ऐतिहासिक नेते लोकमान्य श्री. बाळ गंगाधर टिळक यांच्या नावावरून ठेवण्यात आले असून ‘एज्युकेशन हे सक्षम बनण्यासाठीचे साधन आहे.’ - हे त्यांचे दूरदर्शी विचार प्रस्थापित करण्याच्या हेतूने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रसंगी बोलताना कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक आणि सीईओ श्रीम. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “हा गौरव स्वीकारताना मी नतमस्तक व सन्मानित आहे. फिरोदिया कुटुंबाचे नाव हे नेहमीच ठाम नीतिमूल्ये, राष्ट्रउभारणी व आत्मनिर्भरता तसेच राष्ट्रीयत्वाची खोलवर रुजलेली भावना यांना समानार्थी ठरत आले आहे. माझ्या कामाची अशाप्रकारे दखल घेतली जाणे हे मला व्यापक हित साधण्यासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा देणारे आहे, ज्या दिशेने कायनेटिक ग्रीनमधील आम्ही सातत्याने काम करत आहोत.”
गेल्या अनेक वर्षांत संस्थेने नवा प्रवाह घेऊन येणाऱ्या अनेकांच्या कामाची दखल घेतली आहे व त्यांचा मानद डॉक्टरेट्स देऊन गौरव केला आहे, ज्यांत पंडित भीमसेन जोशी, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. के. एच. संचेती, डॉ. एस. बी. मुजुमदार आणि डॉ. जयंत नारळीकर यांचा समावेश आहे.