आज सगळीकडेच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. गिरगाव येथील भव्यदिव्य शोभायात्रेत स्टार प्रवाहचे कलाकार सामील झाले आणि या सोहळ्याची रंगत द्विगुणीत झाली. निवेदिता सऱाफ, शिवानी सुर्वे, अपूर्वा नेमळेकर, विशाल निकम, पूजा बिरारी, राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे, शिवानी बावकर, आकाश नलावडे, विवेक सांगळे, मानसी कुलकर्णी, हरीश दुधाडे, शर्वरी जोग, अभिजीत आमकर या कलाकारांनी स्वागतयात्रेची शोभा खऱ्या अर्थाने वाढवली.



गुढीपाडव्याच्या या खास प्रसंगी ढोल-ताश्यांच्या गजरात स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळाही थाटात पार पडला. मराठी परंपरेचं प्रतिक असणारी ही मराठी दिनदर्शिका प्रवाह कुटुंबातील कलाकारांच्या मराठमोळ्या अंदाजाने सजली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही दिनदर्शिका प्रेक्षकांना भेट देण्यात आली.