Close

स्टार प्रवाहच्या तू ही रे माझा मितवा मालिकेत अभिनेता आशुतोष गोखले साकारणार खलनायक ( Star Pravah Actor Ashutosh Gokhle Enter In New Serial Tu Hi Re Maza Mitwa As Villain )

स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच तू ही रे माझा मितवा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचं हे पात्र आहे. रंग माझा वेगळा मालिकेत आशुतोषने साकारलेल्या कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत आदर्श पती आणि आदर्श मुलगा साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे.

या नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, ‘याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्यासाठी विचारणा झालीय. तू ही रे माझा मितवा मालिकेतून मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. खरतर थोडं दडपण आहे. रंग माझा वेगळामध्ये सकारात्मक भूमिका मी साकारली मात्र मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायकी झालं होतं.

त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांनी याआधीही अनुभवले आहेत. राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.

Share this article