Close

मसालेदार टोमॅटो व स्टफ्ड टोमॅटो (Spicy Tomatoes And Stuffed Tomatoes)

स्टफ्ड टोमॅटो

साहित्य: 4-5 मध्यम आकाराचे टोमॅटो, 150 ग्रॅम मावा, 100 ग्रॅम पनीर, 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम, 1 टेबलस्पून आरारुट, प्रत्येकी 1 टीस्पून बारीक कापलेले लसूण, आलं व हिरवी मिरची, 1 टीस्पून एव्हरेस्ट शाही मसाला, ग्रेव्हीसाठी 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम, मीठ चवीनुसार, रेड ग्रेव्ही, गार्निशिंगसाठी पनीर व कोथिंबीर.


कृती: टोमॅटोच्या आतील गर काढून घ्या. 100 ग्रॅम मावा, क्रीम व पनीरमध्ये मीठ टाकून मिक्स करा. हे मिश्रण टोमॅटोत भरा. टोमॅटोचा वरचा भाग आरारुटच्या घोळात बुडवून बंद करा. टोमॅटो तळून घ्या. थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढून घ्या. कढईत तेल गरम करून चिरलेली मिरची, आलं, लसूण टाका. रेड ग्रेव्ही, बाकीचे मसाले, मावा व फ्रेश क्रीम टाकून गॅस बंद करा. सर्व्हिंग डिशमध्ये टोमॅटो अरेंज करून त्यावर ग्रेव्ही टाका. किसलेले पनीर व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
रेड ग्रेव्ही बनवण्याची कृती
साहित्य: प्रत्येकी 50 ग्रॅम काजू, मगज, शेंगदाणे, तीळ व खसखस (सर्व उकडून पेस्ट बनवून घ्या.), प्रत्येकी 1 टीस्पून लसूण, लाल मिरची व आलं पेस्ट, 10-12 कांद्यांची पेस्ट (कांदा भाजून वाटून पेस्ट बनवा.), 3-4 टोमॅटोची प्युरी (उकडून, सोलून वाटून घ्या.), अख्खा गरम मसाला (तमालपत्र, काळी मिरी, जिरे, लवंग, मोठी वेलची, चक्री फूल), प्रत्येकी 1 टीस्पून हळद व गरम मसाला, एक वाटी दही, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल.
कृती: पॅनमध्ये तेल गरम करून सगळे अख्खे मसाले टाका. आलं-लसणाची पेस्ट टाकून परता. नंतर कांदा व टोमॅटो परतून घ्या. हळद, गरम मसाला, दही व मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परता. काजू पेस्ट टाकून थोडा वेळ शिजवा.

मसालेदार टोमॅटो


साहित्य: 4 मोठे टोमॅटो, पाव कप कोबी, पाव कप दही, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून राईची पेस्ट, पाव टीस्पून एव्हरेस्ट सफेद मिरी पूड, 5 बारीक कापलेले ऑलिव्ह, 1 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, पाव कप बारीक चिरलेली कांद्याची पात.
कृती: टोमॅटो देठाजवळ कापून त्यातील बिया काढून टाका. एका बाउलमध्ये उरलेले साहित्य एकत्र करून घ्या. हे मिश्रण टोमॅटोत भरा. थंड करून सर्व्ह करा.

Share this article