Close

स्पेशल व्हेज व क्रिस्पी फ्लॉवर (Special Veg And Crispy Flower)

स्पेशल व्हेज
साहित्य: 250 ग्रॅम मिक्स भाज्या (फरसबी, गाजर, कोबी, फ्लॉवर, मटार, भोपळी मिरची, बेबीकॉर्न, पनीर व मशरूम), प्रत्येकी 30 ग्रॅम काजू व मगजची पेस्ट, 2 मोठे कांदे व 2 मोठे टोमॅटो पेस्टसाठी, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, सजावटीसाठी थोडेसे किसलेले पनीर, 50 ग्रॅम मावा, 1 टेबलस्पून क्रीम, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून धणे-जिरे पूड व मीठ चवीनुसार.
कृती: सगळ्या भाज्या उकडून दोन भाग करा. पनीरचे छोटे छोटे तुकडे कापून घ्या. कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून त्याचेही दोन भाग करून घ्या. काजू व मगज पाण्यात भिजवून उकडून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा व भोपळी मिरची टाका. आलं-लसूण पेस्ट टाका. वाटलेला कांदा व टोमॅटो घालून परतून घ्या. उकडलेल्या भाज्या टाका. यात मीठ, हळद, मिरची, धणे पूड, जिरे पूड व गरम मसाला टाकून परतून घ्या. अशाच प्रकारे दुसर्‍या कढईत तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाका. काजू व मगज पेस्ट टाका. उकडलेल्या भाज्या टाका. मीठ, साखर व मावा टाका. 5-7 मिनिटे शिजवून गॅस बंद करा.
सर्व्ह करते वेळी मधोमध लाल ग्रेव्हीची भाजी व आजूबाजूने सफेद ग्रेव्हीची भाजी सजवा. वरून थोडेसे किसलेले पनीर घालून सर्व्ह करा.


क्रिस्पी फ्लॉवर
साहित्यः 1 देठासाहित कापलेला फ्लॉवर, अर्धी भोपळी मिरची, दीड टेबलस्पून चिरलेला लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून बारीक चिरलेले आलं, 1 चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून चिली सॉस, 1 टीस्पून व्हिनेगर, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 टीस्पून काळी मिरची पूड, कांद्याची पात सजावटीसाठी, मीठ चवीनुसार.
कृतीः फ्लॉवर 5 मिनिटे उकडून पाणी काढून टाका. कढईत तेल गरम करून फ्लॉवर डिप फ्राय करून घ्या. एका मोठ्या भांड्यात 1 टीस्पून तेल गरम करून लसूण, हिरवी मिरची, आलं व कांदा घालून परता. नंतर भोपळी मिरचीचे तुकडे घालून 3-4 मिनिटे परता. सर्व सॉस घालून शिजवा. काळी मिरी पूड व मीठ घाला. सर्वात शेवटी तळलेले फ्लॉवरचे तुकडे घाला. कांद्याची पात व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

Share this article