Close

अभिनेत्री सोनाली सहगलनं तिच्या लेकीचं नाव असं काही ठेवलं की तिच्या नावाची होतेय चर्चा (Sonnalli Seygall Reveals Name Of Her Daughter, Explains Thought Behind It)

'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली सहगलनं नुकताच २८ नोव्हेंबरला लेकीला जन्म दिला आहे. आता सोनालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. सोनालीनं इन्स्टाग्रामवर तिच्या लेकीचं नावं आणि त्याचा अर्थ काय हे सांगत पोस्ट शेअर केली आहे.

सोनालीनं तिच्या लेकीचं नाव असं काही ठेवलं आहे ज्यामुळे आता तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. सोनालीनं नावाचा अर्थ काय याबाबतही खुलासा केला आहे.

सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही तर तिच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. सोनाली आणि तिच्या नवऱ्यानं त्यांच्या लेकीचे पाय धरत हार्ट शेप तयार केला आहे.

हा फोटो शेअर करत सोनालीनं कॅप्शन दिलं की शुकर ए सजनानी. आज मी तुम्हाला माझी लाडकी लेक शुकरशी भेटवणार आहे. शुकर हे एक असं नाव आहे, जी आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आली आहे. तिने आमचं आयुष्य हे जादूई करून टाकलं आहे. जी आमच्यासाठी प्रेम आणि आशीर्वादाप्रमाणे आहे. देवाला प्रार्थना आहे की ती कायम तिच्या नावाप्रमाणे झळकत राहो. शुकर तुझं या जगात स्वागत आहे.

शुकर या नावाविषयी बोलायचं झालं तर हिंदीत असा कोणताही शब्द नाही. पण पंजाबमध्ये या नावाचा अर्थ आभारी असणं आहे. तर सोनालीनं जे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिच्या नवऱ्याच्या हातावर शुक्र लिहिलेलं आहे. हा एक हिंदी शब्द आहे. शुक्र शब्दाचा अर्थ घेतला तर ग्रह देखील म्हणू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, हा ग्रह तुमचा आणि पैशांचा संबंध हा कायम चांगला ठेवतो. शुक्र ग्रह हा नवग्रहांमध्ये मोजला जातो. तर हा आठवड्यातील सात वारांपैकी एक शुक्रवारचा स्वामी आहे. त्याशिवाय प्राचीन काळात दैत्यगुरू शुक्राचार्य यांचं नाव शुक्र होतं.

दरम्यान, सोनाली सहगल आणि आशिष हे गेल्यावर्षी जून महिन्यात लग्न बंधनात अडकले होते. या महिन्यात ऑगस्टमध्ये त्यांनी प्रेग्नंसीची घोषणा केली. करियर विषयी बोलायचं झालं तर २०११ मध्ये  'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याशिवाय 'सोनू के टीटू की स्वीटी', 'हाय जॅक', 'जय मम्मी दी' ते'JNU' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/