सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे दोघेही 23 जून रोजी त्यांच्या जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. काल 16 जून रोजी संपूर्ण देशाने फादर्स डे साजरा केला. यावेळी सोनाक्षीने झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवला. तिचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या भावी सासरच्यासोबत दिसत आहे.
16 जून रोजी, झहीर इक्बालची बहीण सनम रत्नासीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर तिच्या वडिलांसोबत एक रंगीत फोटो पोस्ट केले आणि त्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हाही झहीरचे आई-वडील आणि त्याची बहीण सनमसोबत दिसली. फोटोमध्ये सोनाक्षीने सूट घातलेला दिसत होता, तर झहीर ट्रॅक पॅन्टसह पांढऱ्या टी-शर्टमध्ये होता. संपूर्ण इक्बाल कुटुंब कॅमेऱ्यासाठी हसताना दिसले.
फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच तो इंटरनेटवर व्हायरल झाला. सनम रत्नसी एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी'मध्ये तिने बहुतेक स्टार्सची स्टाइल केली आहे.
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे आमंत्रण इंटरनेटवर समोर आले होते. व्हायरल झालेल्या आमंत्रण पत्रिकेवरून असा खुलासा झाला आहे की त्यांचा विवाहसोहळा शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट, बास्टियन, मुंबईत होणार आहे. संध्याकाळचा ड्रेस कोड त्यात दिला आहे. तसेच आमंत्रणात अतिथींना लाल रंगाचे कपडे घालू नयेत असे सांगितले आहे. 'न्यूज 18' च्या रिपोर्टनुसार, लव्हबर्ड्सच्या खास दिवशी आयुष शर्मा, हुमा कुरेशी आणि वरुण शर्मा सारखे लोक उपस्थित राहणार आहेत. संजय लीला भन्साळी, फरदीन खान, ताहा शाह बदुशा, आदिती राव हैदरी, शर्मीन सहगल मेहता यांनाही लग्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
सलमान खान येणार लग्नाला!
सोनाक्षीचा बेस्ट फ्रेंड सलमान खानलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, तो सध्या रश्मिका मंदान्नासोबत 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो लग्नाला उपस्थित राहू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.