दगडी चाळ या सिनेमातील धागा धागा गाण तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड एकत्र झळकणार आहेत. नुकतचं त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचं टीझर शेयर करत ही बातमी दिली. बायडी या गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ही रेट्रो लुक मध्ये दिसत आहे. त्यामुळे गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढवली आहे.
हर्षवर्धन वावरे 'बायडी' गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतो, "अभिनेता पुष्कर जोग यांच्यासाठी मी पहिल्यांदाचं पार्श्वगायक म्हणून काम करत आहे. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ या म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत मी याआधी मॅड केलयं तू, पिल्लू आणि आता बायडी ही गाणी गायली आहेत. या गाण्याचा दिग्दर्शक अभिजीत दाणी हा खूप नम्र आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत फार युनिक आहे तर गाण्याचा निर्माता विशाल राठोड हा एक अष्टपैलू हुशार माणूस आहे. त्याचा मराठी संगीतसृष्टीकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन आहे. टीम सोबत बायडी गाण रेकॉर्ड करताना फार आनंद झाला. मी या आधी तू दिसते, जीव रंगला, तुझी माझी जोडी जमली तसेच वारीसू या साऊथ सिनेमातील रणजिथामे अशी अनेक गाणी गायली आहेत. बायडी गाण्याच्या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. ते पाहून आनंद होतोय. तुमचं असचं प्रेम कायम असू द्यात."
‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.