Close

ओपन रिलेशनशीप (Short Story: Open Relationship 1)

खजील चेहरा आणि विस्कटलेले केस घेऊन निरंजन तिच्यासमोर आला. त्याच्या मुद्रेवरून अनुभवी अरुंधतीने ओळखले की, स्वारी किमान एक तासापूर्वी फ्लॅटमध्ये दाखल झालेली आणि किमान तीन पेग दारू ढोसून बसलेली आहे! आजचा प्रसंग तिच्यासाठी अजिबात नवीन नव्हता.


स्वतःजवळच्या लॅचकीने दरवाजाचे अंगचे कुलूप उघडून अरु आपल्या फ्लॅटमध्ये शिरली. दरवाजा तिने हलकेच बंद केला आणि अचानकपणे तिच्या कानावर रडवेला पण तीव्र स्वर पडला,“अरु, अगं किती उशीर केलास, मी केव्हाची तुझी इथे वाट पाहतोय!”
त्या स्वरापाठोपाठ खजील चेहरा आणि विस्कटलेले केस घेऊन निरंजन तिच्यासमोर आला. त्याच्या मुद्रेवरून अनुभवी अरुंधतीने ओळखले की, स्वारी किमान एक तासापूर्वी फ्लॅटमध्ये दाखल झालेली आणि किमान तीन पेग दारू ढोसून बसलेली आहे! आता हा पुन्हा आपली क्षमा मागण्याचं नाटक करेल, पाया पडेल, नाक घासेल. माझी चूक झाली, पुन्हा मी असं करणार नाही वगैरे वगैरेची गयावया करण्याची भाषा वापरेल. ढसढसा रडेल सुद्धा. यापूर्वीही तिने त्याची ही नाटकं पाहिली होती. आजचा प्रसंग तिच्यासाठी अजिबात नवीन नव्हता. तिनं थंडपणानं त्याच्याकडे पाहिलं.
“काही खाल्लयंस का? का नुसतीच पीत बसलास?” अरुंधतीने निर्विकारपणे त्याला विचारलं. निरंजनचं दारू पिणं तिला नवीन नव्हतं. पण एकदा का प्यायला लागला की, त्याला खाण्यापिण्याची शुद्ध राहत नाही. नुसताच बेसुमार पीत राहतो, ही त्याची सवयही तिला गेल्या दोन वर्षांपासून चांगली माहिती झालेली होती.“नाही, काही खाल्लेलं नाही. तुझीच वाट पाहत टीव्ही लावून बसलो होतो. पण त्यातही मन रमेना. तुला दोनदा मोबाईलवर कॉलही केला, पण तुझे काहीच उत्तर मिळाले नाही!”
त्यावर अरुंधती झटपट कामाला लागली. वॉश बेसिनवर स्वतःच्या चेहर्‍यावर तिने पाण्याचे हबके मारले, चेहरा पुसला. त्यानं तिला थोडं फ्रेशही वाटलं. लगेच फ्रीजमधून चार अंडी काढून, तिनं गॅस पेटवून अंडाभूर्जी तयार करायला घेतली.
“निरंजन, अरे तुला कितीदा सांगितलं की, मला यायला उशीर होत असेल तर तू फ्रीजमधून अंडी काढून आम्लेट करून घे. आम्लेट-पाव खा. किचनमध्ये फ्रुटजाम असतो, तो घेत जा. नुसता पीत जाऊ नकोस. उपाशी राहत जाऊ नकोस. घरात भरपूर तयार खाद्यपदार्थ मी आणून ठेवलेलेच असतात!”
हे बोलत असताना तिला निरंजनबद्दल, त्याच्या उपाशी राहण्याबद्दलची कणवही वाटत होती. आणि त्याचवेळी हा माणूस, त्याच्या सवयी बदलत नाही, याची चीडही होती. गेली दोन वर्षे ही तरुण, सृजनशील गुणी माणसं एका फ्लॅटमध्ये ‘शेअरिंग’ तत्त्वावर राहताहेत. कारण फ्लॅटचं भाडं कोणा एकाला परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी केलेली ही व्यावहारिक तडजोड होती. निरंजन चित्रपटकथा - पटकथा, संवाद लेखक म्हणून, टीव्ही मालिकांचा लेखक म्हणून, कवी - गीतकार म्हणून नाव कमविण्यासाठी मुंबईत येऊन ‘स्ट्रगल’ करीत होता, तर अरुंधतीस एक मॉडेल म्हणून, अभिनेत्री म्हणून याच चित्रपट - टीव्ही मालिका यांच्या दुनियेत स्वतःचे स्थान आणि ओळख निर्माण करायची होती. ही दुनिया ग्लॅमरस आहे. विलक्षण झगमगाटी आहे आणि एकदा का तुमची चलती सुरू झाली, तर तुम्हाला भरपूर प्रसिद्धी, नावलौकिक याच्या जोडीलाच भरपूर पैसा देणारीही आहे. सुदैवाने गेल्या दोन वर्षातील या उभयतांची मेहनत, धडपड आणि स्ट्रगल याला नुकतीच कुठे चांगली फळे यायला सुरुवात झाली होती. दोन वर्षांच्या या सहनिवासामध्ये अरुंधती आणि निरंजन यांच्यात मधुर प्रेमसंबंध निर्माण झाले आणि अत्यंत स्वाभाविकपणे शरीरसंबंधही निर्माण झाले. दोघेही उच्चशिक्षित, उच्चवर्णीय आणि चांगल्या संस्कारात वाढलेले कलावंत होते. चित्रपट-नाटक-टीव्ही सिरिअल्स अशा ग्लॅमरस दुनियेत तरुण कलावंतांचे परस्परांशी संबंध येणारच. त्याचे रूपांतर शरीर संबंधामध्ये होणारच. त्यात काही ‘पाप’ आहे वगैरे बाळबोध विचारांचा ना निरंजन होता ना अरुंधतीस तसे कधी वाटले. याचा अर्थ दोघेही स्वैर संबंधांचे पुरस्कर्ते होते असंही नाही. व्यवसायाच्या - करियरच्या गरजेनुसार तडजोड म्हणून असे संबंध ठेवावे लागतात हे या उभयतांनाही माहिती होते. मान्य होते. आता आपण दोघेही आपापल्या करियरच्या एका ‘टेक ऑफ’ स्टेजमध्ये म्हणजे भरारी घेण्याच्या टप्प्यात येऊन पोचलो आहोत, हे या दोघांनाही कळून चुकलेले होते. या ‘टेक ऑफ’ नंतर आता आपला करियरग्राफ म्हणजे प्रगतीचा आलेख सतत उंचावत जाणार आहे, हे या जोडीच्या लक्षात आले होते. त्यामुळेच एकदा सोबत मद्यपान करीत असताना या जोडीने ठरविले की, आता आपण जीवनाकडे, भविष्याकडे गांभीर्याने पाहायचे. आता उडाणटप्पूपणा बस्स. कामासाठीच्या लैंगिक तडजोडी बंद. मतलबी स्वैरसंबंध बंद. आता आपण दोघांनी रीतसर विवाहबद्ध व्हायचे. एकमेकांशी प्रामाणिक राहत आपापल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून, आपापली प्रगती साधायची. त्यासाठी ‘सेक्स’चा आधार घ्यायचा नाही.
अरुंधती, त्या दिवसापासून त्यांच्या या ठरलेल्या पण अलिखित असलेल्या ‘करारा’प्रमाणे वागत होती. दररोज हे दोघे आज दिवसभरात आपण काय केले, कुठेकुठे गेलो, कुणाला भेटलो, काय अनुभव आला इत्यादी सगळे काही पारदर्शकपणे परस्परांशी ‘शेअर’ करायला लागलो. त्यातून त्यांच्यातील मुळात निर्माण झालेले प्रेम परस्परांबद्दलची ओढ, आदर, यातही वाढ होत गेली. परंतु अरुंधतीला असे जाणवायला लागले की, आपण आपल्याबाबतची प्रामाणिकता, सच्चेपणा जपतोय. परंतु निरंजन तसे वागत नाही.


लेखक म्हणून त्याचा अनेक मुलींशी संबंध येतोय. जी मुलगी शरीरसुख देईल तिला तो त्याने लिहिलेल्या मालिकेत संधी देतोय. प्रमोट करतोय. आणि त्याचवेळी आपल्यावरही गाढ प्रेम आहे, आपण तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हेही दाखवतोय! त्याच्या स्वैरसंबंधांची अनेक प्रकरणे तिच्या कानावर आली होती. काहींचे तर व्हिडिओही तिला मिळाले होते. त्यावरून त्या दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा खडाजंगीही झाली होती. तेव्हा दरवेळी निरंजन माफी मागणे, पाया पडणे, नाक घासणे अशी नाटके करून वेळ मारून नेत होता. अरुंधतीने केलेली अंडाभूर्जी आणि चार पाव अधाश्याप्रमाणे खाल्ल्यानंतर निरंजन बोलू लागला.
“अरुंधती, तुला माझा राग येतोय ना? मी खूप घाणेरडा माणूस आहे, असं वाटतंय ना?”
अरुंधती निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत होती.
“तुला राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे. मी जागोजागी शेण खातो. अशा माणसाचा राग आलाच पाहिजे. पण जरा माझं ऐकून घेणार असशील, तर आज मला तुला याबाबत खुलासेवार सांगायचंय. ऐकणार ना?”
असे म्हणून त्यानं अरुंधतीकडे पाहिलं. अरुंधतीनंही त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यात, स्वरात तीन चार पेग दारू रिचवल्याची लक्षणं स्पष्ट दिसत होती. असा माणसाशी काय बोलायचे, म्हणून अरुंधती
शांतच बसली.
“अरुंधती, सेक्स ही माणसाची एक मूलभूत गरज आहे. त्याला इंग्रजीत ‘बेसिक इंन्स्टीग्ज’ असं म्हणतात. याच नावाचा एक इंग्रजी चित्रपटही मध्यंतरी येऊन गेला. तू नक्कीच पाहिला असशील!”
एवढे बोलून निरंजनने अरुंधतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. पण ती निर्विकारपणे त्याचं म्हणणं ऐकत मख्खपणे बसून होती. हे निरंजनच्याही लक्षात आले. त्यामुळे तिच्या प्रतिसादाची वा हुंकाराची वाट न पाहता निरंजन पुढे बोलू लागला.
“… तर तहान-भूक या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तशीच सेक्स ही देखील गरज आहे. तहान लागली की आपण तात्काळ मिळेल तिथून, मिळेल ती पाण्याची बाटली विकत घेतो, आपली तहान भागवतो. भूक लागली की जवळच्या रेस्टॉरंट, ढाबा, खानावळ, वडापावची गाडी वा जे उपलब्ध असेल तिथे जाऊन आपली पोटाची भूक भागवितो. हो, ना? त्यावेळी आपल्या मनात एकनिष्ठता, चारित्र्य, बाहेरख्यालीपणा, वगैरे कुठले विचार वा मुद्दे असतात का? अजिबात नसतात! कारण गरज पूर्ण करणे हाच विचार त्यावेळी सर्वात महत्त्वाचा असतो! मग हीच भूमिका आपण ’सेक्स’च्या संदर्भात का घेत नाही?”
असा सवाल निरंजनने उभा केला. आता पाळी अरुंधतीच्या उत्तराची, तिच्या भूमिकेची होती. कारण निरंजनचा सवाल बिनतोड होता. आपली संवेदनशीलता, आपला हळवेपणा, आपली विचारप्रक्रिया ही ‘सेक्स’ हा विषय समोर येताच आमुलाग्रपणे बदलते. अन्य शारीर गरजांइतके आपण सेक्स हा विषय कॅज्युअली घेत नाही. निरंजन उत्तरासाठी अरुंधतीच्या डोळ्यात पाहू लागला. काही क्षण असेच गेले.


मग अरुंधती शांत परंतु ठाम स्वरात बोलायला लागली.
“निरंजन तुझा युक्तिवाद, तुझे बोलणे बिनतोड आहे. मी त्याचे प्रत्युत्तर देऊ शकत नाही. मला एवढंच कळतं की, तू जे तत्त्वज्ञान मांडतोयस, ते पशूंचे तत्त्वज्ञान आहे. पशूंमध्ये नातेगोते, चारित्र्य, मोरॅलिटी, एकनिष्ठता इत्यादी काहीच नसते. त्यांच्यात केवळ दैहिक म्हणजे शारीरिक गरजा भागविणे एवढेच महत्त्वाचे असते. कारण त्यांची मती, त्यांची बुद्धी, त्यांचे आकलन आणि आवाका तेवढाच असतो.
पण माणूस आणि पशू यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. माणसाजवळ मेंदू आहे. बुद्धी आहे. चांगले-वाईट, वैध-अवैध, भले-बुरे, नैतिक-अनैतिक हे समजण्याची, त्यात फरक करण्याची प्रज्ञा आहे. दृष्टी आहे आणि म्हणूनच मनुष्यस्वभाव अन्य प्राणिसृष्टीच्या तुलनेत सर्वात प्रगत, यशस्वी मानला जातो. तुझे जीवनाबद्दलचे वर्तन, आकलन आणि तत्त्वज्ञान जर असेच राहणार असेल, तर सॉरी. तुझे-माझे यापुढे एकत्र राहणे शक्य होणार नाही.”
अरुंधतीने शेवटचे वाक्य खूप विचारपूर्वक आणि निर्धारपूर्वक उच्चारले. त्याची तीव्रता ड्रंक असूनही निरंजनला फार स्पष्टपणे जाणवली. त्याने आणखीन बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु अरुंधतीने त्याला बोटाच्या इशार्‍यानेच थांबविले आणि हा फ्लॅट हा सहनिवास, हे संबंध हे सगळे सोडून तुझ्या मार्गाने तू जा असा स्पष्ट संदेश दिला, ही कहाणी इथेच संपली!

सुधीर सेवेकर

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/