ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल कारण यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार आहे. जो आताच्या प्रेक्षकांना हमखास खिळवून ठेवेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचा मुहूर्त अभिनेते विजय पाटकर यांच्याहस्ते नुकताच संपन्न झाला.

या चित्रपटाच्या मुहूर्ताला सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा, विजय पाटकर, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर फय्याज सय्यद तसेच दिग्दर्शक कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते, मच्छिंद्र कदम, दिग्दर्शक शिरीष राणे, राजेश पाटील साहेब, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक नितीन कांबळी, नयन पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

“मिशन मुंबई” चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील, शिवाय ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत, सिद्धेश आचरेकर शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण हे कलाकार देखील या चित्रपटात असणार आहेत. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत ‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांचे आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे असून मेकअप किशोरजी पिंगळे हे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले सांभाळत असून फाइट मास्तर फय्याज सय्यद हे फाइटिंग एक्शनचा भाग करत आहेत. मिशन मुंबई चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.