Close

अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर थिरकणार लावणीवर (Sai Tamhankar Set To Dance To Lavani In Devmanus)

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा देवमाणूस चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ती लावणीवर थिरकणार आहे.

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी तिच्या हटके स्टाईल आणि लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्री सई ताम्हणकर प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सई ताम्हणकरच्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नुकतीच सई ताम्हणकरच्या 'देवमाणूस' चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

अशातच आता तिच्या या चित्रपटातील गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

अभिनेत्रीने सांगितले की, 'लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करणार आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही. मात्र, मी जे काही सादर करणार आहे. ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल याची मला खात्री असल्याचं तिने यावेळी सांगितले.

‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’ चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/