साहित्य : 1 कप साबुदाणे, 1 कप घट्ट ताजं दही, 1 केळं, 1 सफरचंद, अर्धा कप डाळिंबाचे दाणे, 1 टेबलस्पून मध,
2 टेबलस्पून बदामाचे भाजलेले काप.
कृती : साबुदाणे किमान चार तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते पाणी निथळून साबुदाणे अर्धा कप पाण्यात शिजवून घ्या. केळं सोलून, त्याच्या पातळ चकत्या करा. सफरचंदाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. आता दही चांगलं फेटून त्यात साबुदाणे, फळं आणि बदाम एकत्र करा. हे मिश्रण सर्व्हिंग बाऊलमध्ये घालून त्यावर मध घाला आणि सर्व्ह करा.
Link Copied