Close

‘लग्नानंतर पाच वर्षांनी रुबिना दिलैक होणार आई (Rubina Dilaik Is Over 4 Months Pregnant Will Welcome Her First Child Early Next Year)

‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुबिना दिलैक गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचं समोर येत आहे. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. लवकरच या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुबिनाच्या जवळच्या व्यक्तीने हे मान्य केलंय की तिच्या गरोदरपणाविषयी होणाऱ्या चर्चा खऱ्या आहेत.

“रुबिनाच्या प्रेग्नंसीचं वृत्त खरं आहे. तिच्या गरोदरपणातील चौथा महिना सुरू आहे. पुढच्या वर्षी अभिनव आणि रुबिना आई-बाबा होतील. यासाठी दोघंही खूप खुश आहेत”, असं त्या व्यक्तीने म्हटलंय.

मूळची हिमाचल प्रदेशची रुबिना आणि तिचा पती अभिनव हे गेल्या काही दिवसांपासून गरोदरपणाबद्दल बोलणं टाळत होते. काही दिवसांपूर्वी ३५ वर्षीय रुबिनाला एका क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं. याशिवाय तिचा एक फोटोसुद्धा व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती तिचं पोट लपवताना दिसली. तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. अद्याप रुबिना किंवा अभिनवने याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

रुबिनाने २०१८ मध्ये अभिनव शुक्लाशी लग्न केलं. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यानंतर बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला. तेव्हा बिग बॉसच्या घरात रुबिनाने खुलासा केला होता की बऱ्याच गोष्टींवरून तिचे अभिनवसोबत मतभेद होतात. त्यांच्या मनात अनेकदा घटस्फोटाचाही विचार आला होता. मात्र एकमेकांना समजून आणि दुसरी संधी देऊन आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय दोघांनी घेतला.अभिनवशी लग्न करण्याआधी रुबिनाचं अभिनेता अविनाश सचदेवशी अफेअर होतं. ‘छोटी बहू’ या मालिकेत अविनाशने अभिनेत्री रुबिना दिलैकसोबत काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अविनाश आणि रुबिना यांनी २०१२ मध्ये ब्रेकअप केलं. त्यानंतर २०१५ मध्ये अविनाशने ‘इस प्यार को क्या नाम दूँ?’ या मालिकेतील सहअभिनेत्री शाल्मली देसाईशी लग्न केलं.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/