Close

स्वीट सोडा आणि किवी काकडी कूलर (Sweet Soda And Kiwi Cucumber Cooler)

स्वीट सोडा
साहित्य : 1 सोड्याची बाटली (500 मि.ली.), 2 लिंबांचा रस, 1 टीस्पून आल्याचा रस, लिंबाच्या चकत्या, पुदिन्याची पाने.
साखरेचा पाक बनविण्यासाठी (शुगर सिरप) ः अर्धा कप साखर, पाव कप पाणी.
कृती : साखरेचा पाक बनवून घ्या. हे शुगर सिरप सोड्यामध्ये मिसळा. लिंबाचा रस मिसळून कापलेली पुदिन्याची पाने टाका. लिंबाच्या चकत्या लावून सजवा आणि सर्व्ह करा स्वीट सोडा.

किवी काकडी कूलर
साहित्य : 1 कप काकडीचा रस, अर्धा कप किवीच्या बारीक फोडी, अर्धा कप किवीचा गर, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून काळे मीठ, 2 टेबलस्पून खस सिरप.
कृती : काकडीचा रस, किवीचा गर आणि खस सिरप एकत्र करून ब्लेण्ड करा. यात चाट मसाला आणि काळे मीठ टाका. किवीच्या बारीक फोडी सरबतात मिसळा. सर्व्ह करताना वरून एक चमचा खस सिरप टाका. काकडीची चकती लावून सजवा आणि सर्व्ह करा.

Share this article