ओनियन शॉश्लिक
साहित्य: 6 छोटे कांदे, 20 ग्रॅम लसूण, 10 ग्रॅम आलं, 100 ग्रॅम उकडून कुस्करलेले बटाटे, 300 ग्रॅम किसलेला दुधी,
5-10 काजूचे तुकडे, 5 चेरी, 6 अननसाचे तुकडे, प्रत्येकी 1 लाल व हिरवी भोपळी मिरची, 50 ग्रॅम कोथिंबीर, चाट मसाला चवीनुसार, 10-15 ग्रॅम मद्रास करी पावडर, 50 ग्रॅम बटर, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार.
कृती: कांदे स्कूप करून आतील भाग काढून टाका. कांदा गरम तेलात फक्त एक मिनीट परतून बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये बटर गरम करून लसूण व आलं टाकून परतून घ्या. दुधीचा किस टाकून शिजवा. बटाटे, काजू, कोथिंबीर, चाट मसाला, करी पावडर व मीठ टाका. हे मिश्रण थंड झाल्यावर कांद्यात भरा. शीगेत अननसाचे तुकडे, भोपळी मिरची व स्टफ्ड कांदे लावून त्यावर बटर लावा. आवडीनुसार कोळशावर भाजा किंवा ओव्हनमध्ये बेक करा. चेरीने सजवून सर्व्ह करा.
मिक्स व्हेज ग्रेव्ही
साहित्यः 250 ग्रॅम कोबी, प्रत्येकी 50 ग्रॅम फरसबी व गाजर, 25 ग्रॅम भोपळी मिरची, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई, 5-6 कढीपत्ता, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून किसलेले खोबरं.
कृतीः सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून राई व कढीपत्ता टाका. सगळ्या भाज्या व मसाले घाला. भाज्या शिजल्यानंतर लिंबाचा रस व किसलेले खोबरं टाका. गरम-गरम सर्व्ह करा.