साहित्य : 2 कप बारीक चिरलेल्या मिश्र भाज्या (कोबी, गाजर, फरसबी इत्यादी), 2 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं, 2 पातीचे कांदे बारीक चिरलेले, पाव कप मैदा, 5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, 2 टीस्पून चिली सॉस, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, आवश्यकतेनुसार ब्रेड क्रम्स, तळण्यासाठी तेल.
कृती : एका मोठ्या वाडग्यात ब्रेड क्रम्स आणि तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घेऊन चांगलं एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान लांबट (बोटांप्रमाणे) गोळे करा. हे गोळे ब्रेड क्रम्समध्ये घोळून एका डब्यात भरून ठेवा. हा डबा अर्ध्या तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या.
आता एका कढईत तेल गरम करून, त्यात हे शेजवान फिंगर्स सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम शेजवान फिंगर्स शेजवान चटणी किंवा टोमॅटो-चिली सॉससोबत सर्व्ह करा.