ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य हे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अशा बड्या बड्या स्टार्सना डान्सच्या किलर मूव्ह शिकवण्यासाठी ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांची पत्नी विधी आचार्य या अतिशय स्वादिष्ट जेवण बनवतात. एकदा त्यांच्या हातची चव चाखणारा ती चव कधीही विसरत नाही.
रणवीर सिंग, रणबीर कपूर यांसारखे मोठे मोठे स्टार्स विधी यांनी बनवलेल्या विशिष्ट पदार्थाचे चाहते आहेत. अलिकडेच आचार्य यांच्या निवासस्थानी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी चाहत्यांना त्यांच्या स्वयंपाकघराची झलक दाखवली. त्यासोबतच, त्यांनी एक हृदयस्पर्शी खुलासा केला - रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार सारखे बॉलिवूड स्टार्स बहुतेकदा त्यांची पत्नी विधि आचार्य यांनी घरी बनवलेले स्वादिष्ट जेवण जेवण्याची इच्छा व्यक्त करतात.

पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणादरम्यान, गणेश आचार्य यांनी नमूद केले की विधी यांनी त्यांच्या ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटाच्या वेळी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली होती. शुटिंग दरम्यान या चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सना त्या स्वतः बनवलेलं जेवण घेऊन यायच्या. एवढंच नव्हे तर चित्रपटातील गाण्यांचं शुटिंग परदेशात असलं तरी तेथील जेवणाची सर्व व्यवस्था त्या स्वतः पाहत असत. तेथे पुजेसाठी लागणारा प्रसादही विधीने स्वतःच्या हाताने बनवला होता, असे आचार्य म्हणाले.

गणेश आचार्य पुढे सांगतात की, काही बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या पत्नीच्या स्वयंपाकाची विशेष आवड आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंग, अयान मुखर्जी आणि लव रंजन या सर्वांना विधीने बनवलेले चिकन आवडते. ” खरं तर, काही कलाकार शुटिंगला येताना विशिष्ट पदार्थ बनवून आणण्यासाठीची गणेश यांच्याकडे डिमांड करतात. डिमांड अशी असते —'मास्टरजी, पालक चिकन, पालक मूग डाळ'
अक्षय कुमारच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडींबद्दल बोलताना आचार्य यांनी सांगितले की, त्याला विधीच्या हातचे जेवण आवडते परंतु तो फार मसालेदार पदार्थ खात नाही.

विधि आचार्य या दिग्दर्शक आहेत. ‘हे ब्रो’ या चित्रपटाच्या कामासाठी त्या ओळखल्या जातात.