मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याबद्दल न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध नॉन वॉरंटदेखील जारी केले आहे.
न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले तसेच या प्रकरणातील तक्रारदाराला भरपाई म्हणून ३.७२ लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.
२०१८ मध्ये, श्री नावाच्या एका कंपनीच्या मालकाने चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. काही वर्षांपासून राम गोपाल वर्मा आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे ऑफसही विकावे लागले होते. चेक बाउन्स प्रकरणात त्यांना अटक होणार आहे.
राम गोपाल वर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सिंडिकेट या सिनेमाची घोषणा केली होती. आता त्यांच्या अटके मुळे या सिनेमाचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.