रक्षाबंधनाचे औचित्य साधून ३० महिला कारागिरांनी नारळाच्या शेंड्या, लाकडी बटणे, आणि मण्यांपासून २००० पर्यावरणपूर्वक राख्या बनविल्या व उत्पन्न घेतले. बॉम्बे येथील टाटा पॉवर कंपनीच्या पुढाकाराने यासंदर्भात ‘अनोखा धागा’ हा उपक्रम राबवला होता. त्यानुसार या केंद्रात महिलांना या कलेचे प्रशिक्षण देण्यात आले. पर्यावरणाबरोबरच अनोखा धागा उपक्रमातर्फे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमातून इको फ्रेंडली राख्यांबरोबरच पारंपरिक कुंदन व मॅक्रेम ब्रेसलेट या राख्या देखील बनवण्यात येतात.
राखी बनवण्यासोबतच सदर उपक्रमात घरगुती सजावट कॉर्पोरेट वेट वस्तू कपडे व हस्त निर्मित कलेक्शन अशी उत्पादने तयार केली जातात. याकरिता टाटा पॉवर कंपनीतर्फे महिलांना ब्लॉक प्रिंटिंग, शिवणकाम डिझायनिंग आणि पेंटिंग अशा विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमातून ८ राज्यांमधील ८ ठिकाणी 25 हजाराहून अधिक महिलांना सक्षम करण्यात आले आहे. याद्वारे या महिलांनी दरमहा ५ ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून आपले जीवनमान सुधारले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या कुशल महिलांनी एकत्रितपणे ५६ लाख रुपयांची कमाई केली आहे.