Close

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार राखी सावंत, पण यावेळी नवरदेव भारतातील नसून पाकिस्तानातील आहे (Rakhi Sawant Announces Her Third Marriage To Pakistani Actor)

अभिनेत्री राखी सावंत काही न काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता राखी तिच्या लग्नावरुन चर्चेत आली आहे. तिने पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न करत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच तिनं लग्नापासून ते हनिमूनपर्यंत सगळे अपडेट दिले आहेत.

दोन वेळा तलाख झाल्यानंतर ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगत आहे. रितेश सिंह आणि आदिल खान दुर्रानी यांच्यानंतर राखी आता तिसरं लग्न करणार आहे. पण यावेळी नवरदेव भारतातील नसून पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानी अभिनेत्यासोबत ती संसाराचे स्वप्न रंगवत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने म्हटलंय की, ‘मी जेव्हा पाकिस्तानात गेले होते तेव्हा मला लग्नासाठीचे अनेक प्रपोज आले. माझ्या आधीच्या लग्नात मला झालेला त्रास डोडी खानने समजून घेतला. त्यामुळे मी त्याचं प्रपोजल स्वीकारणार आहे.’

सध्या राखीचं डोडी खानसोबत नाव जोडलं जात आहे. दोघं एकत्र सोशल मीडियावर रिल्स बनवताना दिसताहेत. राखीने ती डोडी खानसोबत पाकिस्तानात इस्लामिक पद्धतीने लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. अन्‌ रिसेप्शन भारतात करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

एवढंच नाही तर लग्नानंतर ती हनिमूनला स्वित्झर्लंड नाहीतर नीदरलँडला जाणार आहे. लग्नानंतर ती आणि डोडी दुबईत सेटल होणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर राखीच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. अभिनंदन राखी!

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/