Close

राजगिर्‍याचे पराठे (Rajgira Parathas)


साहित्य : 2-3 वाट्या राजगिर्‍याचे पीठ, 4-5 बटाटे, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 4-5 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून जिरे पावडर, तूप व चवीनुसार मीठ.
कृती : बटाटे उकडून त्याचे साल काढून कुस्करून घ्या. हिरव्या मिरच्या वाटून त्याची पेस्ट तयार करा. कुस्करलेल्या बटाट्यात मीठ, वाटलेली हिरवी मिरची, जिरेपूड, लाल मिरची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता राजगिर्‍याचे पीठ थोडेसे पाणी टाकून मळा. हे पीठ लगेचच भांड्याला चिकटते, तेव्हा थोडेसे तेल लावून मळा. राजगिर्‍याच्या मळलेल्या पिठाचे हलक्या हाताने गोळे करून पारी करून घ्या. यात तयार बटाट्याचे मिश्रण भरून गोळा हाताने हलकाच दाबा. पोळपाटावर राजगिर्‍याचे पीठ पसरवून पराठा लाटून घ्या. हे गरमागरम पराठे दह्यासोबत सर्व्ह करा.

Share this article