अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या गरोदरपणाची गोड बातमी एका वर्षाहून अधिक काळ चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. पण आता एका सुंदर बाळाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
अलीकडेच राधिका आपटेने तिच्या बाळाला स्तनपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ही पोस्ट व्हायरल होताच अभिनेत्रीचे जवळचे मित्र, सहकारी आणि चाहत्यांनी तिला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
आणि आता राधिकाने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटची सीरिज इंटरनेटवर शेअर केली आहे. या फोटोंमध्ये राधिका तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. खरंतर अभिनेत्रीने हे फोटोशूट एका प्रसिद्ध मँगनीजसाठी केले होते. पण अभिनेत्रीने प्रसूतीनंतरच्या या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
मासिकाच्या हँडलवरून पोस्ट केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे - काही वर्षांपूर्वी राधिका आपटेचे लग्न झाल्याचे फार कमी लोकांना माहीत होते. पण आता काही काळापासून अभिनेत्री राखीव राहायला शिकली आहे.
बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024 दरम्यान ऑक्टोबर महिन्यात तिच्या 'सिस्टर मिडनाईट' चित्रपटाच्या रेड कार्पेट प्रीमियरमध्ये अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती.
राधिकाने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील 8 फोटोंची सिरीज शेअर केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री बिनधास्त स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
या मॅटर्निटी फोटोशूटच्या पोस्टपूर्वी राधिकाने आणखी दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. पहिल्या पोस्टमध्ये ती बाळाला दूध पाजताना दिसत आहे, तर दुसऱ्या पोस्टमध्ये प्रसूतीच्या एका आठवड्यानंतर ती बेडवर बसलेली आणि बाळाला तिच्या मांडीवर घेऊन भेटताना दिसते.
राधिकाने कॅप्शनमध्ये लिहिले - बाळंतपणानंतर छोट्या पाहुण्यासोबत पहिली भेट. या पोस्ट्सनंतर तिचे चाहते राधिकाचे खूप कौतुक करत आहेत.